Government of Maharashtra
Skill, Employment, Entrepreneurship and Innovation Department

Maharashtra State Board of Skill, Vocational Education and Training

  • 1. Government of Maharashtra had established Maharashtra State Technical Education Examination Board (MSBTEE) in 1956 under Directorate of Technical Education. In due course of time due to exponential growth of technical and vocational education, Government of Maharashtra bifurcated Directorate of Technical Education and established Directorate of Vocational Education and Training in 1986. Subsequently Maharashtra State Technical Education Examination Board (MSBTEE) was also bifurcated and Maharashtra State Vocational Education Examination Board (MSBVEE) was established vide Government of Maharashtra Resolution dated 23.01.1986.
  • 2. Maharashtra State Vocational Education Examination Board (MSBVEE) is now renamed and established as Maharashtra State Board of Skill, Vocational Education and Training to regulate matters pertaining to Skill, Vocational Education and Training and Entrepreneurship Education as per the National Skill Qualification Framework and other Skills Courses in the State of Maharashtra vide Maharashtra State Board of Skill, Vocational Education and Training Act, 2021 (Mah. Act No. IX of 2022) dated 20.01.2022 which came into force on 26.01.2022.
  • 3. The functions of Board can broadly be classified as following:
    • 3.1. Design and Approval of Course
    • 3.2. Affiliation of Vocational Training Institute (VTI)
    • 3.3. Assessment and Certification
    • 3.4. Training Management, Research and Development
  • 4. Maharashtra State Council of Vocational Training (MSCVT) was established vide Education and Employment Department, Government of Maharashtra Resolution dated 25.09.1984. MSCVT was subsequently registered under Society Registration Act, 1860 on 29.03.2017 as per the directives of Directorate General of Training, Government of India.
  • 5. Since the functions of MSCVT and Board overlapped, MSCVT has been now merged into Board. All the activities of MSCVT and affiliated institutes have been transferred to Board vide Skill Development and Entrepreneurship Department, Government of Maharashtra Resolution dated 16.02.2022.
  • 6. Board presently offers varied duration Certificate Courses, 2 year duration Diploma Courses and 1 year duration Advance Diploma Courses through 1265 affiliated institutes. Beyond its own courses, Board has adopted all the courses designed by Sector Skill Councils. Both the number of courses and institutes are increasing exponentially.
  • 7. All training programs under Board are conducted on a permanent self-financed basis. Maharashtra State Skill Development Society assigns batches under various schemes for conducting training programs in NSQF courses in 6500+ institutes approved by the erstwhile Maharashtra State Vocational Training Council and presently by the Board. The scheme and training are entire administered by Maharashtra State Skill Development Society (MSSDS), however, the assessment of the trainees at the end of training is conducted by the Board and certificates are issued to the qualifying trainees.
  • 8. As per Government letter dated 01.02.2022, skill training institute established by reputed Industrial Establishments/ Institutes, Public Universities, nationally renowned Institutes (IIT/IIM), International Agreements with other countries, skill training/ activities through World Bank, UN Agencies etc. are approved through Green Channel process. In line with this provision, Board has approved skill training institutes established by Agricultural Science Center, Women Economic Development Corporation, Khadi and Cottage Industries Center, Government Industrial Training Institutes, Industrial Establishments, Colleges, Hospitals, Non-Government Social Organizations, etc.
  • 9. Salient features of Board Courses:
    • 9.1. Board courses are divided in 38 different sectors. The courses are designed to give hands on experience in the respective skills set and hence 70 to 80 percentage of course is practical based.
    • 9.2. Two Years duration courses are given equivalency to 12th Standard of Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary School Examination, Pune vide Higher and Technical Education Department, Government of Maharashtra Resolution dated 28.09.2012.
    • 9.3. One and Two year courses are recognized as an alternative qualification to the respective ITI trades for the purpose of job by industries vide Higher and Technical Education Department, Government of Maharashtra Resolution dated 28.09.2012.
    • 9.4. Board has been approved to grant certificate under the name "Diploma Course" to the full-time courses of 2 years duration with entry qualification as 10th standard vide Higher and Technical Education Department, Government of Maharashtra resolution dated 21.01.2013.
    • 9.5. Computer group courses are recognized as Computer Qualification for State Government service vide General Administration Department, Government of Maharashtra Resolution dated 04.02.2013
    • 9.6. Architectural Draftsman and Construction Supervisor courses of Board have been approved as equivalent to the course "Civil Engineering Assistant" in Public Works Department vide Public Works Department, Government of Maharashtra Resolution dated 11.03.2008.
    • 9.7. Construction Supervisor of the Board has been approved as the equivalent course for appointment to the post of Junior Engineering Assistant at Zilla Parishad by nomination vide Rural Development and Water Conservation Department, Government of Maharashtra Resolution dated 26.11.1997.
    • 9.8. 123 Courses of duration one and two years are notified under Apprenticeship Training Scheme by Government of India vide Ministry of Skill Development and Entrepreneurship, Gazette Notification dated 07.09.2017.
    • 9.9. As per Government of India Gazette dated 09.05.2012 candidate passing "Boiler Attendant" course of Board with 1 year of experience is eligible for endorsement as Fireman or Operator or Assistant Fireman or Assistant Operator on steam boiler from Directorate of Boiler.
    • 9.10. Candidates who have passed the course of Building Maintenance and Civil Engineering Assistant of the Board are given registration in Class 7 as Contractors vide Public Works Department, Government of Maharashtra Resolution dated 14.03.1997
    • 9.11. Certificate issued by State Council of Vocational Training (SCVT) for 100 words per minute for Marathi shorthand, 30 words per minute for Marathi typewriting and 80 words per minute for English shorthand is given equivalency with Government Commercial Certificate for appointment to the post of Stenographer in Government and Semi-Government Services vide General Administration Department, Government of Maharashtra Resolution dated 02.09.1994
    • 9.12. Shorthand and Typing certificate issued by Board are accepted for the post of Teachers and Instructors under Shikshan Sevak Yojana vide School Education Department, Government of Maharashtra Resolution dated 18.12.2003.
    • 9.13. Typing and Shorthand Certificate Course in Marathi, English and Hindi languages of Board have been included for selection on the website of Maharashtra State Public Service Commission while applying for the Clerical Post at Maharashtra State Government service.
    • 9.14. Candidates who have completed 2 year duration Diploma courses of Board are qualified for direct second year admission to Post SSC Diploma courses of Maharashtra State Board of Technical Education Examination (MSBTE).
    • 9.15. Candidates who have completed 2 year duration Diploma courses of Board are qualified for first year admission to Post HSC Diploma courses of Maharashtra State Board of Technical Education Examination (MSBET).
    • 9.16. Candidates who have completed training in 23 Diploma courses of two years duration of the Board are qualified for admission to Bachelor of Vocation (B.Voc.) courses at Tata Institute of Social Sciences.
    • 9.17. Candidates having experience in relevant skills are given opportunity to appear for the direct examination of selected courses of the Board (Direct Admission to Examination).
    • 9.18. Candidates admitted for Board courses are eligible for 66.67% travel fare concession for travel by Maharashtra State Road Transport Corporation buses.
  • 10. Assessment:
    • 10.1. The assessment is done at the end of their training for certificate courses and annually for Diploma and Advance Diploma courses.
    • 10.2. The assessment comprises of both formative and summative assessment so as to evaluate the trainee’s overall performance during the training period and at the end of training.
    • 10.3. Board has been conducting assessment of candidates trained under various District, State and Central schemes along with training funded through CSR and self funded basis.
    • 10.4. Board is also conducting practical examinations for technical subjects at 10th Standard on behalf of Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary School Examination, Pune
    • 10.5. Board issues assessment statement to all the trainees undergoing training and offers certificate to the successful trainees.
  • 11. Highlights
    • 11.1. Number of Sectors: 38
    • 11.2. Type of Course:
      • 2 year duration Diploma Course - 53 courses
      • 1 yea1 duration Advance Diploma Course - 6 courses
      • Certificate Course (NSQF Mapped) - 233 courses
      • Certificate Course (Non NSQF) - 99 courses
      • Certificate Course (NSQF) - 2264 courses
    • 11.3. Course Duration:
      • 30 hours to 2 year
      • Diploma and Advance Diploma are full time courses
      • Certificate courses are part time courses
    • 11.4. Apprenticeship
      • 123 Courses of duration one and two years are notified under Apprenticeship Training Scheme by Government of India
  • 1. सन 1956 मध्ये तंत्रशिक्षण संचालनालयांतर्गत महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाची (Maharashtra State Board of Technical Education - MSBTE) स्थापना करण्यात आली होती. सदर मंडळाव्दारे राज्यामध्ये तांत्रिक व व्यवसाय अभ्यासक्रमांची अंमलबजावणी करण्यात येत होती. तथापि, दरम्यानच्या काळात तांत्रिक व व्यवसाय प्रशिक्षणाची व्याप्ती वाढल्याने व औद्योगिकीकरणातील वाढ, बदलते तंत्रज्ञान, सामाजिक व आर्थिक बदल या बाबींचा विचार करता अर्धवट शिक्षण सोडलेल्या विद्यार्थ्यांसाठी तसेच विशिष्ट शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अल्प कालावधीचे व्यावसायिक अभ्यासक्रम तयार करुन अशा विद्यार्थ्यांना रोजगार व स्वयंरोजगारास चालना देण्यासाठी आवश्यक असणाऱ्या व्यवसाय शिक्षणाची गरज भागविण्यासाठी शिक्षण व सेवायोजन विभाग शासन निर्णय दि.23.01.1986 अन्वये महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाचे विभाजन करुन महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळाची (Maharashtra State Board of Vocational Education - MSBVE) स्थापना करण्यात आली.
  • 2. तद्नंतर कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभाग शासन निर्णय दि.11.02.2021 अन्वये सदर मंडळाचे नामांतरण महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास मंडळ असे करण्यात आले.
  • 3. राष्ट्रीय कौशल्य अर्हता आराखडा यानुसार कौशल्य, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण आणि उद्योजकता शिक्षण व महाराष्ट्र राज्यातील इतर कौशल्य पाठ्यक्रम यांच्याशी संबंधित असणाऱ्या बाबींचे नियमन करण्यासाठी आणि तत्संबंधित किंवा तदानुषंगिक इतर बाबींसाठी महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास मंडळाचे नामांतरण करुन “महाराष्ट्र राज्य कौशल्य, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळ” स्थापन करण्यासाठी व विधीसंस्थापित करण्यासाठी “महाराष्ट्र राज्य कौशल्य, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळ अधिनियम, 2021 (सन 2022 चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक 9)” दि.20.01.2022 रोजी निर्गमित करण्यात आला. सदर अधिनियमाची दि.26.01.2022 पासून अंमलबजावणी करण्यात येत आहे.
  • 4. मंडळाचे प्रमुख कार्ये खालील प्रमाणे निर्धारित करण्यात आले आहेत.
    • 4.1. व्यवसाय अभ्यासक्रमांना मान्यता देणे (Course approval)
    • 4.2. कौशल्य प्रशिक्षण संस्थांना संलग्नता देणे (Institute Affiliation)
    • 4.3. कौशल्य चाचणी (Assessment) व प्रमाणीकरण (Certification)
    • 4.4. प्रशिक्षण व्यवस्थापन, संशोधन व विकास (Training Management, Research and Development)
  • 5. दरम्यान महाराष्ट्र राज्य व्यवसाय प्रशिक्षण परिषद (Maharashtra State Council of Vocational Training - MSCVT) या संस्थेची स्थापना शिक्षण व रोजगार विभाग, शासन निर्णय दि.25.09.1984 अन्वये करण्यात आली होती. राज्यात व्यवसाय प्रशिक्षणाची व्याप्ती वाढविण्याकरीता अल्प मुदतीचे व्यवसाय अभ्यासक्रम राबविणे तसेच औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये अभ्यासक्रम सुरू करण्यास मान्यता देणे, विद्यार्थ्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर मूल्यमापन करुन प्रमाणपत्र देणे अशी जबाबदारी परिषदेची आहे.
  • 6. महाराष्ट्र राज्य व्यवसाय प्रशिक्षण परिषदेची सोसायटी नोंदणी कायदा, 1860 अंतर्गत सोसायटी म्हणून नोंदणी करण्यास कौशल्य विकास व उद्योजकता विभाग शासन निर्णय दि.18.01.2017 अन्वये मान्यता देण्यात आली. त्या अनुषंगाने दि.29.03.2017 रोजी मा. सहाय्यक संस्था निबंधक, बृहन्मुंबई विभाग, मुंबई यांचे कडे परिषदेची “सोसायटी” म्हणून नोंदणी करण्यात आली आहे.
  • 7. कौशल्य विकास व उद्योजकता विभाग शासन निर्णय दि.26.12.2017 अन्वये महाराष्ट्र राज्य व्यवसाय प्रशिक्षण परिषदेची कार्यकक्षा निर्धारीत करण्यात आली आहे.
  • 8. तथापि, महाराष्ट्र राज्य कौशल्य, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळ व महाराष्ट्र राज्य व्यवसाय प्रशिक्षण परिषद यांचे कार्ये व उद्दिष्ट्ये समान असल्याने कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभाग शासन निर्णय दि.१६.02.२०२२ अन्वये महाराष्ट्र राज्य कौशल्य, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळामध्ये महाराष्ट्र राज्य व्यवसाय प्रशिक्षण परिषद या संस्थेचे विलीनीकरण करण्यात आले आहे. सबब, परिषदेची निर्धारित कार्ये आता मंडळाव्दारे अंमलात आणण्यात येत आहेत.
  • 9. मंडळाने संलग्नता दिलेल्या 1265 संस्थांमध्ये मंडळाचे काही तासांपासुन, सहा महिने, एक वर्ष व दोन वर्ष कालावधीचे अर्धवेळ व पूर्णवेळ असे 365 पदविका (Diploma), प्रगत पदविका (Advance Diploma) व प्रमाणपत्र अभ्यासक्रमांत (Certificate Course) प्रशिक्षण देण्यात येत आहे‍. सर्व Sector Skill Council यांचे 2200+ NSQF अभ्यासक्रम मंडळाने स्विकृत (Adopt) केले आहेत.
  • 10. मंडळांतर्गत सर्व प्रशिक्षण कार्यक्रम स्वयंअर्थसहाय्य‍ित तत्त्वावर राबविण्यात येतात. तत्कालिन महाराष्ट्र राज्य व्यवसाय प्रशिक्षण परिषदेने व सद्यस्थितीत मंडळाने मान्यता दिलेल्या 6500+ संस्थांमध्ये NSQF अभ्यासक्रमांत प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्याकरिता महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी (Maharashtra State Skill Development Society - MSSDS) यांच्याव्दारे विविध योजनेंतर्गत तुकड्या (Batches) मंजुर करण्यात येतात. सदर योजना व प्रशिक्षणाचे व्यवस्थापन महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी (MSSDS) यांच्याव्दारे करण्यात येते तथापि, प्रशिक्षण पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थ्यांची कौशल्य चाचणी मंडळाव्दारे घेण्यात येते व उत्तीर्ण प्रशिक्षणार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात येते.
  • 11. शासन पत्र दि.01.02.2022 अन्वये नामवंत औद्योगिक आस्थापना/ संस्था, सार्वजानिक विद्यापीठे, राष्ट्रीय पातळीवरील नामांकित संस्था (IIT/IIM), इतर देशांसोबत झालेले व भविष्यात होणारे आंतरराष्ट्रीय करारनाम्यांमधील कौशल्य प्रशिक्षण तसेच जागतिक बँक, UN Agencies या संस्थांमार्फत असलेले कौशल्य प्रशिक्षण/ उपक्रमांना/ संस्था यांना Green Channel व्दारे सूचीबध्द करण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्याअनुषंगाने सद्यस्थितीत मंडळाव्दारे कृषी विज्ञान संस्था, महिला अर्थिक विकास महामंडळास सूचीबध्द संस्था, खादी व ग्रामोद्योग केंद्रास सूचीबध्द संस्था, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, औद्योगिक आस्थापना, महाविद्यालय, रुग्णालय, गैर सरकारी सामाजिक संस्था, इत्यादी संस्थांना त्यांच्या कडे उपलब्ध पायाभूत सुविधांव्दारे संबंधीत व्यवसाय अभ्यासक्रमात प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यासाठी Green Channel व्दारे तात्काळ मान्यता देण्यात येते.
  • 12. महाराष्ट्र राज्य कौशल्य, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळाच्या अभ्यासक्रमांची ठळक वैशिष्ट्ये:
    • 12.1. मंडळाचे अभ्यासक्रम 38 वेगवेगळ्या सेक्टरमध्ये विभागलेले आहेत. मंडळाचे अभ्यासक्रम हे प्रशिक्षणार्थ्यांना संबंधित कौशल्यात पारांगत करण्यासाठी तयार करण्यात आले असल्यानेच 70 ते 80 टक्के अभ्यासक्रम प्रात्यक्षिकावर आधारित आहेत.
    • 12.2. उच्च व तंत्र शिक्षण विभाग शासन निर्णय दि.28.09.2012 अन्वये मंडळाचे दोन वर्षे कालावधीच्या अभ्यासक्रमांना उच्च शिक्षणाच्या +2 स्तराची समकक्षता (Equivalence) निश्चित करण्यात आली आहे.
    • 12.3. उच्च व तंत्र शिक्षण विभाग शासन निर्णय दि.28.09.2012 अन्वये मंडळाचे 1 वर्ष व 2 वर्ष कालावधीचे अभ्यासक्रमांना औद्योगिक प्रशिक्षण संस्थांतील संबंधीत अभ्यासक्रमांशी नोकरीसाठी पर्यायी शैक्षणिक अर्हता (Alternate Qualification ) म्हणून निर्धारित करण्यात आली आहे.
    • 12.4. उच्च व तंत्र शिक्षण विभाग शासन निर्णय दि.21.01.2013 अन्वये मंडळाचे इयत्ता 10 वी प्रवेश शैक्षणिक अर्हता असलेल्या 2 वर्ष कालावधीचे पूर्णवेळ स्वरुपाच्या अभ्यासक्रमांना "पदविका अभ्यासक्रम" (Diploma Course) अशा नावाने प्रमाणपत्र प्रदान करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
    • 12.5. माहिती तंत्रज्ञान (सा.प्र.वि.) विभाग, शासन निर्णय दि.04.02.2013 अन्वये मंडळाचे संगणक गटातील (Computer Group) संगणक विषयी असलेल्या अभ्यासक्रमाचे प्रमाणपत्रधारक कर्मचारी हे शासकीय सेवेसाठी आवश्यक असलेली संगणक अर्हता परीक्षा उत्तीर्ण असल्याचे समजण्यात येते.
    • 12.6. सार्वजानिक बांधकाम विभाग शासन निर्णय दि.11.03.2008 अन्वये सार्वजनिक बांधकाम विभागातील "स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक" या पाठयक्रमाशी मंडळातील वास्तूशास्त्र आरेखक (आर्किटेक्चरल ड्राफ्टसमन) व कनस्ट्रक्शन सुपरवायझर अभ्यासक्रमांना समकक्ष म्हणून मान्यता देण्यात आली आहे.
    • 12.7. ग्रामविकास व जलसंधारण विभाग शासन निर्णय दि.26.11.1997 अन्वये जिल्हा परिषदेमधील कनिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक या पदावर नामनिर्देशनाने नियुक्ती करण्यासाठी मंडळाचा बांधकाम पर्यवेक्षक हा अभ्यासक्रम समकक्ष म्हणून मान्यता देण्यात आली आहे.
    • 12.8. भारत सरकार द्वारा निर्गमित भारत राजपत्र दि.07.09.2017 कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय, नवी दिल्ली अन्वये महाराष्ट राज्य व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळाच्या 123 अभ्यासक्रमांना ॲप्रेन्टिसेस अधिनियम 1961 लागू करण्यात आलेली आहे.
    • 12.9. भारत सरकार द्वारा निर्गमित भारत राजपत्र दि.09.05.2012 अन्वये मंडळाचा “बॉयलर अटेंडंन्ट” (Boiler Attendant) हा अभ्यासक्रम उत्तीर्ण झाल्यानंतर स्टिम बॉयलरवरील फायरमन किंवा ऑपरेटर किंवा असिस्टंट फायरमन किंवा असिस्टंट ऑपरेटर म्हणून 1 वर्ष कालावधीचा अनुभव धारण केल्यानंतर बाष्पके संचालनालयाकडील (Directorate of Boiler) व्दितीय बॉयलर परिचर (Equivalent of second class Boiler Attendant Certificate of competency) समकक्षतेच्या पृष्ठांकनासाठी पात्र आहे.
    • 12.10. सार्वजानिक बांधकाम विभाग शासन निर्णय दि.14.03.1997 अन्वये मंडळाच्या इमारत देखभाल व स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक हे अभ्यासक्रम उत्तीर्ण उमेदवारांना कंत्राटदार म्हणून वर्ग 7 मध्ये नोंदणी देण्यात येते.
    • 12.11. सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय दि.02.09.1994 अन्वये राज्य व्यावसायिक प्रशिक्षण परिषदेमार्फत मराठी लघुलेखनासाठी 100 शब्द प्रतिमिनिट, मराठी टंकलेखनासाठी 30 शब्द प्रतिमिनिट व इंग्रजी लघुलेखनासाठी 80 शब्द प्रतिमिनिट प्रमाणपत्र हे शासकीय व निमशासकीय सेवतील लघुटंकलेखक पदाच्या नियुक्तीसाठी शासकीय वाणिज्य प्रमाणपत्राशी समकक्ष ठरविण्यात आले आहे.
    • 12.12. शालेय शिक्षण विभाग, शासन निर्णय दि.18.12.2003 अन्वये शिक्षकीय पदांव्यतिरिक्त इतर शिक्षक व निदेशक यांची शिक्षण सेवक योजनेंतर्गत नियुक्ती करण्याबाबत अर्हता निर्धारित करण्यात आली आहे. त्यानुसार लघुलेखन व टंकलेखन निदेशक व टंकलेखन निदेशक या पदाकरीता “व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळाने दिलेले प्रमाणपत्र” स्विकारण्यात आले आहे.
    • 12.13. महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या संकेतस्थळावर राज्य शासनाच्या लिपिक पदासाठी अर्ज करतांना मंडळांतर्गत मराठी, इंग्रजी व हिंदी भाषेत टंकलेखन व लघुलेखन अभ्यासक्रम प्रमाणपत्राचा निवडीसाठी समावेश करण्यात आला आहे.
    • 12.14. मंडळाच्या दोन वर्ष कालावधीच्या अभ्यासक्रमांना महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण परीक्षा मंडळाच्या (MSBTE) पदविका अभ्यासक्रमांना थेट द्वितीय वर्षांस प्रवेशास पात्र ठरविण्यात आले आहे.
    • 12.15. मंडळाच्या दोन वर्ष कालावधीच्या अभ्यासक्रमांना महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण परीक्षा मंडळाच्या (MSBET) बारावी वर आधारीत पदविका अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्ष प्रवेशास पात्र ठरविण्यात आले आहे.
    • 12.16. मंडळाचे दोन वर्षे कालावधीच्या 23 पदवीका (Diploma) अभ्यासक्रमात प्रशिक्षण पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थ्यांना Tata Institute of Social Sciences व्दारे व्यवसाय पदवी (Bachelor of Vocation) अभ्यासक्रमांत प्रवेशाकरिता पात्र केले आहे.
    • 12.17. संबंधीत कौशल्यात उनुभव असलेल्या उमेदवारांना मंडळाच्या काही निवडक अभ्यासक्रमांच्या परीक्षेसाठी थेट बसण्याची (Direct Admission to Examination) संधी उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
    • 12.18. मंडळाच्या अभ्यासक्रमांत प्रवेशित विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या प्रवासात 66.67% प्रवास शुल्क सवलत अनुज्ञये आहे.
  • 13. कौशल्य चाचणी:
    • 13.1. प्रमाणपत्र अभ्यासक्रमांसाठी प्रशिक्षणाच्या शेवटी आणि पदविका व प्रगत पदविका अभ्यासक्रमांसाठी वार्षिक कौशल्य चाचणी घेण्यात येते.
    • 13.2. प्रशिक्षण कालावधी दरम्यान आणि प्रशिक्षणाच्या शेवटी प्रशिक्षणार्थीच्या एकूण कौशल्याचे मूल्यमापन करण्यासाठी फॉर्मेटिव्ह आणि समेटिव्ह अशा दोन्ही प्रकारच्या कौशल्य चाचणीचा समावेश करण्यात आला आहे.
    • 13.3. विविध जिल्हा, राज्य आणि केंद्र शासनाच्या योजनांतर्गत तसेच CSR आणि स्वयंअर्थसहाय्य‍ित तत्त्वावर प्रशिक्षिण पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थ्यांची कौशल्य चाचणी मंडळाव्दारे घेण्यात येते.
    • 13.4. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा परीक्षा मंडळ, पुणे यांच्या वतीने माध्यमिक शालांन्त प्रमाणपत्र (इ.10 वी) पूर्व व्यवसायिक विषयांच्या प्रात्यक्षिक परीक्षा मंडळाव्दारे घेण्यात येतात.
    • 13.5. कौशल्य चाचणी नंतर सर्व प्रशिक्षणार्थींना मंडळाव्दारे निकाल पत्र आणि उत्तीर्ण प्रशिक्षणार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात येते.
  • 14. ठळक वैशिष्ट्ये
    • 14.1. अभ्यास गट (Sector): 38 अभ्यासगट
    • 14.2. अभ्यासक्रमांचे प्रकार (Type of Courses):
      • 2 वर्ष कालावधी पदवीका अभ्यासक्रम - 53 अभ्यासक्रम
      • 1 वष कालावधी प्रगत पदवीका अभ्यासक्रम - 6 अभ्यासक्रम
      • प्रमाणपत्र अभ्यासक्रम (NSQF Mapped) - 233 अभ्यासक्रम
      • प्रमाणपत्र अभ्यासक्रम (Non NSQF) - 99 अभ्यासक्रम
      • प्रमाणपत्र अभ्यासक्रम (NSQF) - 2264 अभ्यासक्रम
    • 14.3. अभ्यासक्रम कालावधी (Course Duration):
      • 30 तास ते 2 वर्ष
      • पदवीका व प्रगत पदवीका अभ्यासक्रम हे पूर्ण वेळ अभ्यासक्रम आहेत
      • प्रमाणपत्र अभ्यासक्रम हे अर्ध वेळ अभ्यासक्रम आहेत
    • 14.4. शिकाऊ प्रशिक्षण उमेदवारी (Apprenticeship)
      • 123 अभ्यासक्रमांना केंद्र शासनाची शिकाऊ प्रशिक्षण उमेदवारी योजना लागू आहे